Love affair story; लाडकी बहीण योजनेला धक्का; केवायसी करण्यासाठी आली आणि प्रियकरा सोबत  पळून गेली….

Love affair story; लाडकी बहीण योजनेला धक्का; केवायसी करण्यासाठी आली आणि प्रियकरा सोबत  पळून गेली….

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून विविध कारणांसाठी महिला घराबाहेर पडत आहेत. असाच प्रकार हदगांवमध्ये घडला, तालुक्यातील एका खेड्यातील विवाहिता केवायसी करण्यासाठी दि. २३ जुलै रोजी अडीच वर्षाच्या मुलाला घेऊन आपल्या पतीसोबत हदगावला आली.

परंतु नवन्याला गुंगारा देऊन प्रियकरा सोबत पळून गेली. मिसिंग दाखल केल्यानंतर हदगाव पोलिसांनी शुक्रवारी तिला प्रियकरासह पकडून आणले, परंतु सदर तरुणीने आपण प्रियकरासोबतच जाणार असे ठामपणे सांगून नवऱ्याला फारकत दिली.

हदगाव तालुक्यातील ही घटना असली तरी या प्रेम कहाणीचे उगमस्थान कळमनुरी तालुक्यात आहे. कळमनुरी तालुक्यात माहेर असलेल्या शेतकरी कुटुंबातील या तरुणीचा विवाह २०१७ मध्ये हदगाव तालुक्यातील एका खेड्यातील शेतकरी तरुणासोबत रितीरिवाजाप्रमाणे झाला.

आधीकचि महिती जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा…

विवाह रुपी संसार वेलीवर त्यांना २०२२ च्या मे महिन्यात मुलगा झाला. शेती थोडी असल्याने व या तरुणीचा सासरा शेती सांभाळत असल्यामुळे पतीने कळमनुरी तालुक्यातील शिऊर येथील साखर कारखान्यावर कंत्राटी कामावर नोकरी मिळवली. या कारखान्यावर काम करण्यासाठी या तरुणीनेच त्याला उद्युक्त केले होते.

शेतीचे उत्पन्न पुरेसे नसल्यामुळे कुटुंबीयांनी कारखान्यात काम करण्यास परवानगी दिली होती. हा कारखाना त्या कुटुंबाच्या राहत्या गावापासून २२ किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यांच्या गावापासून कारखान्यावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे ये-जा करण्याची सोय नव्हती. त्यामुळे हे दोघे पती-पत्नी मुलाला घेऊन कारखाना परिसरातच राहायला गेले आणि त्यावेळे पासूनच या प्रेम कहाणीला बहर आला.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री शिदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी व अगोदरच असलेल्या बैंक खात्याला केवायसी करण्यासाठी ही विवाहिता पती व मुलासह तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे हदगावला आली. याचवेळी पूर्वनियोजित कटानुसार त्या विवाहित तरुणीचा प्रियकर सुद्धा हदगावला आला.

या दोघांवर पाळत ठेवत ती त्यांच्या मागावरच हदगाव शहरात फिरला, तरुणीच्या पतीची नजर चुकवून त्या प्रियकराचे तरुणी सोबत इशारे सुरू होते. काही काम आटोपल्यानंतर या तरुणीने आपल्या पतीला मुलासाठी खाऊ आणायला घोड्या अंतरावर असलेल्या दुकानावर पाठवले. ही संधी साधून प्रियकरासोबत ही विवाहिता पसार झाली.

खाऊ घेऊन आल्यानंतर त्या तरुणीच्या पतीने सायंकाळपर्यंत त्यांचा शोध घेतला. पंरतु ते सापडले नाही. त्याने घडलेला प्रकार फोन करून आपल्या वडिलांना सांगितला, शेवटी त्या तरुणीची शोधाशोध केल्यानंतर ती आपल्या प्रियकर सीबत अज्ञातस्थळी राहायला गेल्याचे समजले.

यावेळी त्यांच्यासोचत त्या तरुणीचा अडीच वर्षे वयाचा मुलगा होता. दोन दिवसानंतर त्या पती राजाने आपली बायको पळून गेल्याची म्हणजे हरवल्याची तक्रार दिली आणि हदगाव पोलीस ठाण्यात मिसिग प्रकरण दाखल झाले. दरम्यान, हा प्रियकर या विवाहितेच्या पतीसोबतच त्या कारखान्यावर कामगार माणून काम करत होता. त्यामुळे त्यांचे जुने प्रेम संबंध पुन्हा उफाळून आले. Read more 

 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असेल तर आमच्याश थेट संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा…

Leave a Comment